वीस वर्षांनंतर माजी विद्याथी एकत्र

। सुतारवाडी । वार्ताहर ।

वीस वर्षानंतर पाताळगंगा हायस्कूलचे विद्यार्थी व्हाट्सअपच्या माध्यमातून गगनगिरी मठात एकत्र आले. विशेष म्हणजे हे विद्यार्थी 2000 सालापासून इयत्ता पाचवीच्या वर्गात होते. ते सर्व विद्यार्थी (दि.14) मे रोजी एकत्र आले होते. त्यातील कोणी शिक्षक, उद्योजक, डॉक्टर, वकील, मॅनेजर अशा विविध पदावर कार्यरत आहेत. यावेळी इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत च्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करत पुन्हा भेटू या असे सांगून निरोप घेतला.

Exit mobile version