| मुंबई | प्रतिनिधी |
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात आला. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती. ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.