ऑलिम्पिकमध्ये अमेरिकाचा पदकांचा विक्रम

सोव्हिएत युनियन दुसर्‍या स्थानी तर, ग्रेट ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर

| पॅरिस | वृत्तसंस्था |

ऑलिम्पिक 2024 स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण ऑलिम्पिकच्या इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? वास्तविक या यादीत अमेरिका अव्वल आहे. ऑलिम्पिक इतिहासात पदक जिंकण्याच्या बाबतीत अमेरिकेच्या जवळपासही कोणी नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक 1065 सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर आहे.

ऑलिम्पिकच्या इतिहासात अमेरिकेचे वर्चस्व
ऑलिम्पिकच्या इतिहासात एक हजाराहून अधिक सुवर्णपदके जिंकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. याशिवाय अमेरिकेने 835 रौप्य आणि 738 कांस्यपदके जिंकली आहेत. अशा प्रकारे अमेरिकेने एकूण 2638 पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर, सोव्हिएत युनियन या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. सोव्हिएत युनियनने ऑलिम्पिक इतिहासात 395 सुवर्ण पदकांसह 1010 पदके जिंकली आहेत. युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियननंतर ग्रेट ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर आहे. ग्रेट ब्रिटन या देशाने आतापर्यंत 285 सुवर्ण पदकांसह ऑलिम्पिक स्पर्धेत तिसर्‍या स्थानावर आहे. 285 सुवर्ण पदकांसह ग्रेट ब्रिटनने 918 पदके जिंकली आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, या देशाची लोकसंख्या केवळ 7 कोटी आहे, परंतु ऑलिम्पिक खेळांमध्ये दबदबा दिसून आला आहे. या देशांनंतर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत चीनने 261 सुवर्णपदके जिंकली आहेत. यानंतर फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात फ्रेंच खेळाडूंनी 223 सुवर्णपदके जिंकली आहेत. अशाप्रकारे, अमेरिका शिवाय ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणार्‍या देशांमध्ये सोव्हिएत युनियन, ग्रेट ब्रिटन, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. भारताच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीवर एक नजर टाकली तर भारताने ऑलिम्पिकमध्ये एकूण 35 पदके जिंकली आहेत. त्यामुळे सर्वाधिक पदके जिंकण्याच्या यादीत भारत 58 व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर एकूण 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदके आहेत.
Exit mobile version