| माणगाव | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त माणगाव नागरपंचायतीतर्फे माझी माती माझा देश अंतर्गत शनिवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता अमृत कलश शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते कलशामध्ये माती टाकून करण्यात आली. ही शोभायात्रा माणगाव नगरपंचायत येथून निघून बाजारपेठेतून शेलार नाका येथे वळसा घालून नवीन बस स्थानक येथून फिरून पुन्हा नगरपंचायत कार्यालय याठिकाणी येथून शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
या शोभायात्रेत भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास कोकण विभाग संयोजिका शर्मिला सत्वे, माणगाव नगरीचे उपनगराध्यक्ष राजेश मेहता, माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, माजी स्वच्छता सभापती अजित तारळेकर, स्वीकृत नगरसेवक सिराज परदेशी, माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत चंद्रकांत शेट, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरपंचायतीचे कर्मचारी, अशोकदादा साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एम. जाधव, पत्रकार मजिद हाजिते, व्यापारी, ग्रामस्थ आदींसह अशोकदादा साबळे विद्यालय व श्रद्धा इंग्लिश स्कूल माणगावचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.







