। पेण । वार्ताहर ।
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन पेण तालुक्यात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पेण तहसिल कार्यालयाचा ध्वजारोहण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पेणचे आमदार रवि पाटील, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नायब तहसिलदार नितीन परदेशी, सेवा निवृत्त प्रांत अधिकारी अनिल सावंत, सेवा निवृत्त तहसिलदार विनायक सुकाळे यांच्यासह राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पेण पोलिस ठाण्याचे ध्वजारोहण पोलिस निरिक्षक देवेंद्र पोल यांच्या हस्ते गांधी वाचनालय पेण येथील ध्वजारोहण डॉ.सोनाली मनिष वनगे तर पेण नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर नग रपालिकेच्या सभागृहात पेण तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी करणार्या खेळाडूंचे यथोचित सत्कार करण्यात आले. तसेच हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद शाळांमधून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आले.
पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रशाळांचे ध्वजारोहण प्राचार्य डॉ.सदानंद धारप यांच्या हस्ते करण्यात आला. पेण पंचायत समितीचे ध्वजारोहण उपअभियंता बांधकाम विभाग विश्वास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये मआजादी का अमृत महोत्सवफ या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषक वितरण समारंभ करण्यात आले. पेण सत्र न्यानालयाचे ध्वजारोहण दिवाणी न्यायाधिश श्रीमती रूबिना एन. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तिरंगा रॅलीचे आयोजन पेण न्यायालयाकडून करण्यात आले होते. ही रॅली शहरात फिरविण्यात आली. एन.व्ही.जी. या शैक्षणिक संस्थेच्या कोनायन्सन शाळेचे ध्वजारोहण ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आले. पेण शहरात तिरंगा रथ रॅली फिरविली. या रथ रॅलीला प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या.
तर पेणमधील हौशी पोहणार्यांनी कुंभार तळयाला अमृत महोत्सवा निमित्त 75 परिक्रमा करण्याचा कार्यक्रम करण्याचा ठेवला होता. यामध्ये पेण मधील असंख्य पोहणार्यांनी सहभाग घेतला होता. यासह तालुक्यात गावोगावी मोठया उत्साहात अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. महर घर तिरंगाफ या तीन दिवसाच्या अभियानाची सांगता सांयकाळी नागरिकांनी आपल्या घरावरील राष्ट्रध्वज सन्मानाने उतरवून केली.