भागोजी डवले यांचा अमृतमहोत्सव

| माणगाव | वार्ताहर |

कुणबी भवन माणगाव येथे भागोजी डवले यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम रविवारी (दि.17) त्यांच्या कुटुंबीयांनी व समाज बांधवानी माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमास राजिपचे माजी कृषी सभापती अस्लम राऊत, यशोधरा गोडबोले, संगीता बक्कम, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, आनंद यादव, संदीप खरंगटे, कृउबा समिती सभापती रमेश मोरे, शैलेश भोनकर, रामभाऊ टेंबे, काका नवगने, शांताराम भोरावकर, सहादेव बक्कम, नामदेव शिंदे, सुरेश वाढवळ सुभाष गुगले, सतीश पवार, सखाराम जाधव, राजेंद्र जाधव, रवींद्र अर्बन, कृष्णा पानवकर, काशिनाथ पाखुर्डे, शैलेश यादव, हबीब इसाने, काशीराम पोवार, तुकाराम डवले, सीताराम भोनकर, सुरेश वडेकर, नथुराम मोरे आदींसह डवले कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version