। पनवेल । वार्ताहर ।
अमृत 2.0 अभियान अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावाकरिता पाणीपुरवठा योजनेस मंजुरी प्राप्त आहे. या योजने अंतर्गत सद्यस्थितीत 11 ठिकाणी जलकुंभाची कामे सुरु आहेत व 57 किमी लांबीची जलवाहिनी अंथरण्याचे काम पुर्ण झालेले आहे. नुकतीच या कामाची पहाणी आयुक्त प्रशांत रसाळ यांनी केली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपअभियंता विलास चव्हाण, सल्लागार प्रतिनिधी व ठेकेदार उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सुरु असलेली सर्व जलकुंभाची कामे सुरक्षित पातळी पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारांना दिल्या.