जेएनपीटीमध्ये अमृत महोत्सव साजरा

। उरण । वार्ताहर ।
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत देशातील अग्रणी कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीटीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच बरोबर विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे. जेएनपीटीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत रायगड जिल्ह्यातील चार वृद्धाश्रमांना विविध प्रकारची मदत केली आहे. वृद्धाश्रमातील लोकांसाठी जेएनपीटीने सिमेंट काँक्रीटचे बेंच, सिटिंग मॅट, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर आणि इन्व्हर्टरसारख्या विविध गरजेच्या वस्तुंची मदत केली आहे. तसेच पुढील महिन्यांत रायगड जिल्ह्यातील वंचित मुलांना मदत, त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी/नेत्र तपासणी शिबीर, परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार जेएनपीटीकडून करण्यात येणार आहे. याशिवाय बंदर परिसरातील लोकांसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर व तज्ञ व्यक्तींची प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन, आहार जागरूकता, स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे सुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाने दिली.

Exit mobile version