| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईत नागपाडा परिसरातील एका 8 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. जुबेर शाह असे त्या आरोपीचे नाव आहे. जुबेर हा एक दागिने विकणारा व्यावसायिक असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील नागपाडा भागातही एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कानातले विकणा-याने 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी झुबेर शाह या आरोपीला अटक केली आहे. शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेने या नराधमाचे कृत्य पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर झुबेर शाहने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी झुबेर याच्यावर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.