सिमेंटने भरलेल्या ट्रकचा अपघात; चालक सुखरूप

| म्हसळा | प्रतिनिधी |

नागोठण्याकडून म्हसळाकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा शुक्रवारी (दि.10) सकाळी अपघात झाला. घोणसे घाटातून सिमेंट घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटला त्यामध्येच रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीला जोरदार धडक लागली. त्यामुळे ट्रक सह सिमेंटचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी व जखमी झाले नाही.

ट्रक नागोठणेकडून म्हसळ्याकडे राष्ट्रीय मार्गावरून येत असताना घोणसे घाटांतील केळेवाडी या परिसरांत तीव्र उतार आणि शिघ्र वळणावर चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघाताची नोंद करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. हा घाट राष्ट्रीय मार्गावर येत आसल्याने घाटातील या  ४ ते ५ कि.मी.चा मार्ग तांत्रिक दृष्ट्या सदोष आसल्याने प्रत्येक अपघाताची नोंद आणि चौकशी व्हावी, अशी या भागांतील सर्व राजकीय, सामाजिक संस्थाची मागणी आहे.

Exit mobile version