सुडकोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

| कोलाड | वार्ताहर |

तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची सुडकोली चणेरा येथील जीडीटी फ्युचर स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे व ऋतुजा तटकरे लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका नुरीना शिंगरे यांनी वार्षिक रिपोर्ट प्रोजेक्टर द्वारे सादर केला. कार्यक्रमास तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे रजिस्टर अजित तेलंगे, एमडीएम स्कूल आणि जीडीटी स्कूलचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर, प्रा. डॉक्टर विश्‍वास देशमुख, योगिनी देशमुख, मुख्याध्यापिका मीनाक्षी केसरकर, व तटकरे इन्स्टिट्यूट च्या विविध युनिट्सचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version