विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरातील उघड्या डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाशिक शहराजवळील पुणे रोडवरील हॅपी होम कॉलनी राहणाऱ्या अरमान मुन्ना अन्सारी या मुलासोबत ही घटना घडली आहे. शाळेला सुट्टी असल्याने हनुमान हा मित्रांसोबत खेळत होता. यावेळी त्याला विद्युत विभागाकडून लावण्यात आलेल्या डीपीच्या बाहेरचा शॉक लागला. यावेळी शॉक लागल्यानंतर तो गंभीरित्या भाजला गेला घटना सही उपस्थित नागरिकांनी त्याला रुग्णाला दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version