जिल्हा परिषद शाळांना घरघर

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

पटसंख्येअभावी संगमेश्‍वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली आहे. दरवर्षी शाळा बंद होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र असून चालू शैक्षणिक वर्षात पटसंख्येअभावी 8 शाळा बंद झाल्या आहेत. 400 हून अधिक असलेल्या शाळांची संख्या आता 334 वर येवून ठेपली आहे. या बंद झालेल्या शाळांमध्ये कुंभारखाणी खुर्द, गवळवाडी, भोवडे बाईंगवाडी, निवधे, धनगरवाडी, निवधे गवळीवाडी, कनकाडी तांबडवाडी, देवळे वाणीवाडी, डिंगणी बागवाडी, आंबवली उर्दू यांचा समावेश आहे. संगमेश्‍वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. अनेक गाव व वाड्या डोंगरात वसलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी गावागावात शाळा सुरू करण्यात आल्या. तालुक्यात 10 वर्षापूर्वी 400 हून अधिक जिल्हा परिषद शाळा होत्या.

Exit mobile version