। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
पुणे येथील प्रख्यात व ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रा. आनंद तथा नंदा जोशी यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या मुली व कुटुंबियांनी नुकताच पुणे येथे आयोजित केला होता यावेळी डॉ.विश्वास डाके यांच्यासह जोशी यांच्या पत्नी, मुली,जावई, नातवंडे यांच्यासह प्राचार्या डॉ.रोहिणी पटवर्धन,न्या.ए.एम. मुजावर,निवृत्त पोलीस अधिकारी .रासकर,भाऊ कानगुडे आदिंचा समावेश होता.