। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील नडवली गावच्या रहिवासी आनंदीबाई पांडुरंग शिर्के यांचे रविवारी (दि.19) वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. आनंदीबाई शिर्के या सुस्वभावी, विनम्र व परोपकारी वृत्तीच्या होत्या. तसेच सामाजिक कार्यक्रमात देखील त्या सक्रीय असायच्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून दशपिंड मंगळवारी (दि.28) तर उत्तरकार्य शुक्रवारी (दि.1) नडवली येथील राहत्या निवासस्थानी होणार आहे.