। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी घेण्यात येणार्या क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धांचे आयोजन सोमवारी (दि.16) सांबरी शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात राजिप शाळा आनंदवाडीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात समूहगीत गायन, पथनाट्य, समूह नृत्य, लंगडी मुली, माती शिल्पात प्रथम क्रमांक, लगोरी मुले आणि दोरी उड्यांत द्वितीय क्रमांक पटकावला अहे. यावेळी एकूण आठ स्पर्धांपैकी पाच स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक सूर्यकांत पाटील, मुख्याध्यापिका मंगला पाटील यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रत्नप्रभा गोळे, अजित गोळे, जनार्दन सुर्वे, उमेश पुगांवकर, मनोज थळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यांनी तसेच केंद्रप्रमुख मंगेश शेरमकर यांनी अभिनंदन केले आहे.