। उरण । वार्ताहर ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निषेधार्थ शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने शुक्रवारी (दि.20) रायगड जिल्हाप्रमुख मा.आ. मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, गणेश शिंदे, विनोद म्हात्रे, कैलास पाटील, नगरसेवक समीर मुकरी, महेंद्र पाटील, जगजीवन नाईक, आशिष गोवारी, वंदना पवार, रंजना तांडेल, रविंद्र पाटील, पाटील, गुलजार भाटकर, रवींद्र भोईर, मेघशाम कडू, आयुब मीर, योगेश गोवारी, इस्माईल शेख, फतेह खान, निलेश म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते.