| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची शुक्रवारी (दि.20) रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.