पीएनपी संकुलात रंगणार प्रभाविष्कार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‘प्रभाविष्कार’ या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि.21) सायंकाळी करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व अलिबागकरांना गाण्यांची मेजवानी या निमित्ताने मिळणार आहे. या सोहळ्यास संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार आहेत. अभिजीत कोसंबी यांनी झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील सारेगम संगीत स्पर्धेतील त्यांनी पहिले महागायक होण्याचा सन्मान मिळवला आहे. गझलकार, संगीतकार, गीतकार म्हणून त्यांनी कमी कालावधीत नाव लौकीक केला आहे.
पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‘प्रभाविष्कार’ सोहळा रंगणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जाणार आहे. 21 डिसेंबरला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा ते ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि महागरबाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व कार्यक्रम पीएनपी संकुलात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. भव्यदिव्य स्वरुपात होणार्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पीएनपी संकुलाच्या वतीने करण्यात आले आहे.