| कोर्लई | वार्ताहर |
रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मुरुड तालुक्यातील नांदगावच्या प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उप प्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रमोद भायदे, प्रशांत कासेकर, नांदगावच्या सरपंच सेजलताई घुमकर, उपसरपंच मेघा महेश मापगावकर, शिवसेना नेते नरेश कुबल, सुदेश घुमकर, काँग्रेसचे अस्लम हलडे, गणेश गाणार, योगेश पाटील, विक्रांत कुबल, भालचंद्र घुमकर, नितेश रावजी, मंजुम घोले, उदय थळे, प्रफुल्ल आरेकर, अलीम मुल्ला, सुरेश मालवणकर, चंद्रकांत देऊळकर, जया चोरघे, भक्ती चोरघे, अमित भोबू, कल्पेश मळेकर, आतिष आग्रावकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते नरेश कुबल व सरपंच सेजल घुमकर यांनी गीते यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मतदार संघातील बहुतांशी मतदारांचा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळत असल्याचे सांगून मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील मुस्लिम मतदारांचाही मोठा पाठिंबा असल्याचे झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.