अनंत घरत यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौल-पिरांचे देऊळ येथील निवृत्त पोलीस अधिकारी अनंत तुकाराम घरत (94) यांचे नुकतेच वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी रायगड पोलीस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. तसेच, पुष्पचक्रही अर्पण करण्यात आले. घरत यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.23) पिरांचे देऊळ येथे, तर दिवसकार्य शुक्रवारी (दि.26) राहत्या घरी होणार असल्याचे घरत कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घरत परिवाराचे सांत्वन केले.

Exit mobile version