अनंत पाटील यांचे निधन

| उरण | वार्ताहर |
केगाव येथील शेकापचे माजी ग्रा.पं. सदस्य अनंत मोरेश्‍वर पाटील यांचे निधन झाले. एनएडी मधील लालबावटा युनियनचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम होते. केगाव उरण परिसरात त्यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवारी (29 सप्टेंबर) श्री क्षेत्र माणकेश्‍वर येथे सकाळी सात वाजता व व बारावे शुक्रवारी (30 सप्टेंबर) राहत्या घरी केगाव बाजारपूर येथे होणार आह. त्यांच्या पाठीमागे दोन मुलग, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version