‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुक मतदानाला सकाळपासून सुरुवात

। मुंबई । वृत्तसंस्था ।

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचा मुद्दा ठरलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वा. पासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

Exit mobile version