| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे अनिरूद्ध राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नारळफोडी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी अनिकेत रसाळ ठरला, तर द्वितीय क्रमांक हर्ष ठाकूर, तृतीय क्रमांक अनिकेत नागवेकर, चतुर्थ क्रमांक संदीप भोईर हे विजेते ठरले. नागाव ग्रामपंचायत सभागृहात रविवार, दि. 20 ऑगस्ट रोजी अनिरूद्ध राणे मित्रमंडळ यांच्यावतीने नारळफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, मनोहर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसरपंच मंजुषा राणे, माजी उपसरपंच श्रीकांत आठवले, शौकिन राणे, सुरेंद्र नागलेकर, परेश ठाकूर, संजय म्हात्रे, विकास पिंपळे, सचिन राऊळ, राकेश राणे, समीर राणे, दिपराज धुळप, मंगेश ठाकूर, रोहन नाईक, मंगेश राणे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोन विलास आंब्रे यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी उपसरपंच मंजुषा राणे, शौकिन राणे, अनिरूद्ध राणे व मित्रमंडळ यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये पाच हजार रोख व चषक, द्वितीय क्रमांकास रूपये 3 हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकास रूपये दोन हजार रोख व चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये दोन हजार व चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.