। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत ग्रामस्थांनी रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे चिंचोटी गावातील दुधारी मंदिर बांधकामाकरिता मागणी केली होती. त्या कामाची पूर्तता खासदार तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या आमदार फंडातून पंधरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या कामाचे पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, चारुहास मगर, अमित नाईक, संचित म्हात्रे व चिंचोटी ग्रामस्थ उपस्थित होते.