पालकमंत्रीपदावरून अनिल परब यांनी महायुतीला फटकारले

। मुंबई । प्रतिनिधी ।

पालकमंत्रीपदावरून सध्या महायुतीत धुसफूस सुरू आहे. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेले वाद हिसांचारापर्यंत पोहोचले. अद्यापही या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.

ही पालकमंत्रीपदाची लढाई नाही मालकमंत्रीपदाची लढाई आहे. हे जिल्ह्याचे पालक नाही मालक बनायला चालले आहेत. एवढं काय आहे त्या पालकमंत्रीपदात ज्यासाठी जिल्ह्यात फिरू देणार नाही इथपर्यंत वाद टोकाला गेला आहे. त्या जिल्ह्यातली मलाई काढून घेण्यासाठी यांना मंत्रीपद हवं आहे. ज्याला विकास करायचा त्याला कोणताही जिल्हा दिला तरी तो त्या जिल्ह्याचा पालक म्हणून विकास करण्यासाठी काम करू शकतो. परंतू, हा मालकपदाचा वाद आहे, असे अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Exit mobile version