कर्नाळा अभय अरण्यात प्राणीगणना

तीन पाणवठ्याच्या ठिकाणी मंचान, ट्रॅप कॅमेर्‍याच्या साहाय्याने गणना

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री देश भरातील अभय आरण्यात प्राणी गणना केली जात असल्याने कर्नाळा पक्षी अभय आरण्यात देखील शुक्रवारी ( ता.5) प्राणीगणना करण्यात आली. या करता अभय आरण्य परिसरातील तीन पाणवठ्याच्या ठिकाणी मंचान तयार करण्यात आले असून, या ठिकाणी तैनात वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून ट्रॅप कॅमेर्‍याच्या साहाय्याने पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांची गणना करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाळा पक्षी अभय आरण्याचे वनअधिकारी नारायण राठोड यांनी दिली आहे. मुबंई – गोवा महामंर्गावर पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभय आरण्यात विविध प्रजातीच्या वृक्षासोबत पशु पक्षांचे वास्तव्य आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देश भरातील अभय आरण्यातील प्राण्यांची गणना केली जात असल्याने कर्नाळा पक्षी अभय आरण्यात देखील वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव प्रेमींच्या मदतीने प्राणी गणना करण्यात येणार आहे. अरण्यात तयार करण्यात आलेल्या मचाणावर बसून ही गणना केली जात असल्याने वन्य प्रेमिसाठी बुद्ध पौर्णिमेचा हा दिवस एक मोठी पर्वणी असते. वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात. त्यामुळे अरण्यातील प्राणी पाणी पिण्यासाठी हमखास पाणवठ्यावर येत असतात. करोना काळातील काही वर्ष वगळता कर्नाळा पक्षी अभय आरण्यात दर वर्षी प्राणी गणना करण्यात येते.

दुपार पासूनच अधिकारी मंचाणावर

कर्नाळा पक्षी अभय अरण्यात 3 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मंचणावर शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून वन कर्मचारी बसणार आहेत. प्रत्येक मंचाणावर दोन कर्मचारी बसणार असून, त्यांच्या सोबत प्राणी गणणे साठी उपस्थित राहणार्‍या वन्य प्रेमीना देखील बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर पाणवठ्या च्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. शनिवारी ( ता.6) सकाळी 8 पर्यत ही प्राणी गणना सुरु राहणार आहे.

Exit mobile version