जनावरांची तस्करी पोलिसांनी उधळली

टेम्पो जप्त, चालकासह एकावर गुन्हा दाखल

| शिहू | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरून महाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची खबर नागोठणे पोलिसांना मिळताच वाकण फाटा येथे सापळा रचून जनावरांनी भरलेले आयशर टेम्पो पकडून जनावरांची सुटका केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.7 रोजी 12 वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरून महाडकडून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच-03-डीव्ही-8021) वाकण फाटा येथे आला असता त्यामध्ये दोन लाख रुपये किमतीच्या दहा म्हशी अंदाजे वय आठ ते दहा वर्षे कोणताही चारा अगर पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालक व अन्य एकास नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार एम.व्ही. लांगी करीत आहेत.

Exit mobile version