। उरण । वार्ताहर ।
ग्रामसेवक युनियनच्या रायगडच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीबद्दल उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष दिलीप तुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तसेच नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन केले.
पंचायत समितीच्या परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपाध्यक्षपदी अनिता म्हात्रे, सचिव महेश पवार, कोषाध्यक्ष सौ.उर्मिला पाटील यांची निवड करण्यात आल्याने उपस्थित युनियनच्या सभासदांनी,उरण पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.