|अलिबाग । वार्ताहर ।
नवी मुंबई सुवर्णकार महिलामंडळ सदस्या अनिता विभांडिक यांना महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारीशक्ती गौरव संमेलनात टी.एम.जी. क्रियेशन व अमरदिप बालविकास फाउंडेशन तसेच महाराष्ट्र लोककल्याणकारी संस्था नवीन पनवेल(पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मार्च रोजी सुनिता नाशिककर,यास्मिन मोलकर,संजिवनी जाधव ,वर्षा पडवळ,.जया अमिलचंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नारीरत्न आयकॉन पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. यावेळी नमिता राणे प्रा.अंशुल शर्मा, डॉ. सारिका पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी व प्रेक्षक वर्ग यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते