अंकुश जाधव स्वदेशी भारत पुरस्काराने सन्मानित

। खांब-रोहे । वार्ताहर ।
दिव्यांग शिक्षक तथा कवी, लेखक व सामाजिक कार्यकर्ते अंकुश नथुराम जाधव यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन स्वदेशी भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्वदेशी भारत बचत गट सकुंडेमळा आसू, ता. फलटण, जि. सातारा काळेश्‍वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्यांग आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित असणारे अंकुश जाधव हे रोहे तालुक्यातील निवी गावचे आहेत. तर पनवेल येथे दिव्यांग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील शेकडो पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Exit mobile version