| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील देहरंग या संपूर्ण आदिवासी विभागात गेली चार दशके यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या सत्कर्मश्रध्दाश्रम या संस्थेचा ४० वा वर्धापन सोहळा संस्थेच्या ममाउलीफ सेवासंकुलातील समाज मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास डॉ. नितीन थोरात,प्रा. श्री. विद्याधर वालावलकर उपस्थित होते. उभयतांनी यावेळी मार्गदर्शन केेले. संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार्या आकर्षक कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संस्थेस आपल्या विविध स्वरूपातील सहकार्याने सतत प्रोत्साहन करणार्या सह्कार्यप्रवण, दानशूर, हितचिंतकांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. या सोहळ्याची सांगता पनवेल मधील बागीश्वरी भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने झाली.
सत्कर्मश्रध्दाश्रमचा वर्धापनदिन सोहळा
