खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन

| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड प्रेस क्लब संलग्न असलेली खालापूर प्रेस क्लब संघटनेचा 19वा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा 3 एप्रिल रोजी खा. श्रीरंग बारणे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक मान्यवराच्या उपस्थितीत दिमाखात खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात पार पडला.

खालापूर तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.. त्याचबरोबर महिला बचत व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य व नगरसेवक, नगरसेविका यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवन गौरव पुरस्काराने खोपोली नगरपालिकेचे माजी अभियंता अशोक पाटील, सुवर्णा जोशी, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, सचिन पवार, विठ्ठल मोरे, अविनाश आमले, संजीवनी पिंगळे, विशाल रसाळ, डॉ. चंद्रशेखर भगत, सुजित देशमुख, योगेश पाटील, समीर देवघरे, डॉ. धनंजय किसवे, आदर्श ग्रामपंचायत स्व.संतोष पवार स्मृती पुरस्काराने होनाड ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले. तसेच आदर्श महिला बचत गट म्हणून जांबरूग, घोडीवली, सावरोली, वीणानगर, शिळफाटा यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खा. श्रीरंग बारणे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, सुवर्णा जोशी, कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, संतोष बैलमारे, वैशाली खैर, मनोज खांबे, प्रशांत गोपाले, अश्विनी पाटील, उत्तम प्रबळकर, जे.पी.पाटील, अनिल सानप, सुवर्ण मोरे, किशोर पाटील, प्रतीक्षा रेटरेकर, विनायक तेलवणे, रूपाली जाधव, ऐश्वर्या पाटील, श्वेला आहीर, ॲड.अनिता पवार आदी प्रमुखांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाले, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हाळ, अनिल पाटील, रवींद्र मोरे, एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, समाधान दिसले, बंटी साळुंखे, नवज्योत पिंगळे, संतोषी म्हात्रे आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version