। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर प्रेस क्लबने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांबरोबर देव दिवाळीचा आनंद घेत संवाद साधला. तसेच त्याच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी केले. यावेळी मिलिंद आष्टीवकर, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरिष पवार, माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे, दत्ताजी मसुरकर, आश्विनी पाटील, भारत रांजणकर, किशोर पाटील, संदीप पाटील, नारायण चौधरी आदीसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, भाई ओव्हाळ, अनिल पाटील, रवींद्र मोरे, एस.टी.पाटील, समाधान दिसले व पदाधिकार्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले.