मुंबई पोर्ट कामगार संघटनेचा वर्धापन दिन

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई पोर्ट कामगार संघटनेचा 103 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गोदी कामगार नेते सुधाकर अपराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन ग्रीन येथील चालक, मालक व तंत्रज्ञ कामगारांच्या वतीने डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस, युनियनचे कार्यकर्ते बाबुराव जाधव, सुनील सरगर, गोरक्ष थोरात, संजय कांबळे, नाना तोरस्कर, बाळाराम पेडगावकर, अमरजीत पाशी, मोहन टाकळकर, अण्णा राऊत आणि इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अपराज यांनी कामगारांनी संघर्ष करून मिळविलेले 44 कामगार कायद्यांचे रूपांतर केंद्र सरकारने 4 कायद्यात केल्यामुळे, कामगार चळवळीला भविष्यात येणारा काळ अधिक आव्हानात्मक आहे. संघर्ष क़रुन मिळविलेल्या, पगार, सेवाशर्ती, सेवानिवृत्तिनंतरचे फ़ायदे, वैद्यकिय सुविधा टिकविण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी गोदी कामगारांची एकता व अखंडता अभेद्य असने अत्यंत आवश्यक आहे. डॉ. शांती पटेल आणि कॉ. एस. आर. कुलकर्णी यानी दाखविलेल्या मार्गाने आपण भविष्यात अ‍ॅड.एस. के. शेटये यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढा देऊन गोदी कामगारांच्या मागण्या मिळवून घेऊ. यावेळी युनियनचा वर्धापन दिन, अक्षयतृतीया व रमझान ईद निमित्त कामगारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version