रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

रायगड प्रेस क्लबचा 19 वा वर्धापन दिन आणि प्रेस क्लब सन्मान सोहळा रविवारी (दि.18) श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर उत्साहात संपन्न झाला.

रायगड प्रेस क्लबच्या या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते मान्यवर पत्रकारांना पुरस्कार वितरित करुन सन्मानित करण्यात आले. तसेच, अतुल कुलकर्णी (आ.अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान), संजय खांबेटे (प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान), अभय आपटे, स्नेहल पाटकर, महेंद्र दुसार, मोहन जाधव, दीपक पाटील, काशिनाथ जाधव, इलियास ढोकले, पुनम धुमाळ, संतोष ठाकूर, विजय गिरी, संतोष रेळेकर, रविंद्र कान्हेकर आदि पत्रकारांना विविध प्रेस क्लब सन्मानाने गौरविण्यात आले. तर विशेष स्थानिक सन्मान अली अब्दुल रझाक काझी, इफ्तीखार शब्बीर चरफरे, महंमद हनिफ गफार मेमन, विक्रम गायकवाड, दीपक धनवटे, किशोर वाडिया व रुपेश तिताडे यांना जाहीर करुन गौरविण्यात आले.

Exit mobile version