बोर्लीपंचतन | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन श्रीवर्धन येथे शेकापचे माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या सुलभा सदन निवास्थानाच्या प्रांगणात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. तालुका चिटणीस वसंत यादव यांच्या उपस्थितीत बोर्लीपंचतन येथील शेकापचे जेष्ठ नेते विलास तोडणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी वसंत यादव यानी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले की शेतकरी कामगार पक्ष हा सामाजिक ऐक्याची,बंधुत्वाची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करून गरीब,दुःखी, शोषित,पिडीत सागरपुत्र आणि वनवासी यांचे अश्रू पुसण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे.महागाई मध्ये होरपळलेल्या जनतेला चार घास सुखाचे खायचे असतील तर शेकाप शिवाय पर्याय नाही.
याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपाल कवाडे, लिलाधर खोत,विश्वास तोडणकर,अमित पाटील,ओमकार खोत,अनिकेत खोत,अरुण मांजरेकर,सुधीर पाखड, अंन्सार चोगले,अथर पांगारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.