श्री राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन

| तळा | वार्ताहर |

श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज संस्था तळाच्या श्री राधाकृष्ण मंदिराचा 121 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि.12) साजरा करण्यात आला. सकाळी 5.30 ते 8.00 वा. श्रींची विधिवत पूजा हरिश्‍चंद्र रोडे व चंद्रकांत रोडे सालकरी यांचे हस्ते करण्यात आली. महेंद्र कजबजे व सुभाष मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली काकड आरती भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

श्री राधाकृष्ण देवांची पालखी मिरवणूक श्री राधाकृष्ण मंदिर, रोडे आळी, बाजारपेठ हनुमान मंदिर, बाजारपेठ शिंपी आळी, श्री दत्त मंदिर, मुळे यांचे नाक्यावरून बळीचा नाका, सोनार आळी, डॉ. काळबेरे यांचे निवासस्थानावरून बकुळीच्या पारावरून पुन्हा मंदिरात स्थानापन्न होते. यादरम्यान घरोघरी सुहासिनी श्री देवांचे औक्षण करून पूजा केली. फटाक्यांची आतष बाजी, खालू-टाळ मृदंगाचे निनादात हरी नामाचा जयजयकार, अभंग-गवळणी यांचे सुरेल आवाजाने सारे वातावरण भक्तीमय, भक्ती सागरात बुडालेले पाहावयास मिळाला. अबालवृद्ध, युवक, युवती, महिला सारे जण हरिनामाचा गजर करीत होते. सारे दृष्य चैतन्यमय होते. महिला युवती फुगडी, रिंगण, झेलीम खेळून आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सालकरी व्यवस्थापक, विश्‍वस्त, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ, समाजबांधव, भगिनी, भाविक ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version