। तळे । वार्ताहर ।
अखंड हिंदुस्तानात पायी चालत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करीत समाज प्रबोधन करीत 750 वर्षापूर्वी ज्यांनी समाजाला उत्तम दिशा देण्याचे काम करणारे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करून संजीवन समाधीत दिनी शासकीय सुट्टी शासनाने जाहीर करावे असे महत्वपूर्ण विचार रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे अध्यक्ष तथा कोकण विभागाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघ व श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज संस्था-तळा आयोजित जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजामधील इयत्ता 10वी व इयत्ता 12 वी मधील प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिनी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व ऑनलाइन वकृत्व स्पर्धा लहान व मोठा गट पारितोषिक वितरण आणि विशेष कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान या सोहळ्यानिमित्त करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय नामदेव समाजउन्नती परिषदेचे विश्वस्त अॅड.ज्ञानेश्वर पाटसकर(पुणे) पुणे शहर शाखा ना.स. परिषदेचे अध्यक्ष संदीप लचके (पुणे)राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनरल सेक्रेटरी सुभाष मुळे (पुणे) नामदेव हितवर्धक मासिकाचे कार्यकारी सदस्य सुनील कुमार पोरे (खारघर) तर तळे नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष महेंद्र कसबजे हे उपस्थित होते.