। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या प्रवासी संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रवासी संघटनेने स्थानकातील स्थानक प्रबंधक कार्यालयात असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रवासी संघटना भिवपुरी रोड या संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रवसी संघटनेचे सदस्य धनंजय थोरवे, स्टेशन प्रबंधक अंकित कुमार, रेल्वे कर्मचारी रूपकुमार, इत्यमलाई, सानिका बोराडे, मनोहर नाईक, तानाजी मोडक, संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर साळोखे, रोशन साळोखे, नितिन गायकवाड, अशोक गायकवाड, प्रशांत गायकवाड, रुपेश गायकवाड, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.