चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर येथील शिवधन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 25 वी. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 06 ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 1998 साली 15 हजार रुपयांच्या भाग भांडवलावर स्थापन केलेल्या पतसंस्थने आर्थिक वर्ष 2022 23 अखेर 21 कोटींच्या वरचा टप्पा पार केलेला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार व सभासद हित यासाठी या संस्थेने पतधोरण आखले आहे. पतसंस्थेने सहकारांमध्ये भरीव कामगिरी केली असून, तालुक्यातील ग्राहकांना पतसंस्थेने आत्याधुनिक सेवा द्यायला सुरुवात केली आहे. पतसंस्थेचे संचालक कर्मचाऱ्यांचे काम व ग्राहकांचा विश्वास त्यामुळे पतसंस्था प्रगतीपथावर आहे. पतसंस्थेचे ठेवीदार व ग्राहक यांचा पतसंस्थेवरील विश्वास ही आमची मोठी ताकद असून, कामकाजाचे सातत्य ठेवणे हि आमची प्रमुख जबाबदारी असल्याचे चेअरमन गणेश म्हात्रे यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात 40 कोटींच्यावर उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. मनोहर भोईर यांनी पतसंस्थेला भेट दिली. व पतसंस्था प्रगतीपथावर नेल्याबद्ल चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तसेच पतसंस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संतोष ठाकूर, शशांक ठाकूर, समाधान ठाकूर, अरुण ठाकूर, ज्योती म्हात्रे, गजानन वशेणीकर, अशोक फोफेरकर, विलास ठाकूर, दीपक पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, अनंत पाटील, विवेक केणी, अमित चिरनेरकर, रेणुका ठाकूर, रंजना म्हात्रे, प्रभाकर ठाकूर, चांगदेव जोशी तसेच अन्य मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन वशेणीकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.