| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा नवघर येथे सन 2024-25 चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ग्रामयुक्ती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन सूर्यकुमार राव, नागमणी राव मॅडम, सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, सुधागड तालुक्याचे माजी सभापती रमेश सुतार, नवघर ग्रामपंचायतीच्या सरपंच माई चव्हाण, उपसरपंच संजय मोरे, केंद्रप्रमुख अनिल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या वार्षिक स्नेहसंमेलनात एकूण 30 कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वारकरी दिंडी, शंभू चरित्र, शिव तांडव, भीम गीत, देशभक्तीपर नृत्य, फनी डान्स, कोळीगीते, महिला सुरक्षा पथनाटय, वासुदेव गीत, शेतकरी नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने स्नेहसंमेलनात सहभाग घेतला होता. इयत्ता 1 ली, 2 रीच्या विद्यार्थ्यांनी दोन सुंदर डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली. या संपूर्ण कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा, पालकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाकरिता ग्रामयुक्ती संस्थेचे संचालक राम चव्हाण, पोलीस पाटील किशोर दळवी, ग्रामपंचायत सदस्य अजय चव्हाण, दिव्या सुतार, प्राजक्ता रोकडे /पवार, नामदेव लांगी, दिनानाथ मालुसरे, अनुष्का जाधव, शाळा शाळेचे माजी मुख्याध्यापक जगदीश म्हात्रे, शशिकांत ठोंबरे, राकेश गदमले,माजी विद्यार्थी विशाल पवार, जांभूळपाडा केंद्र प्रमुख आनंदा पाटील, प्रा.शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे,सुरेश उमटे,शिक्षक नवनीत म्हात्रे, संदेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, जनार्दन भिलारे,पांडुरंग ठोंबरे, प्रशांत गुरव, लक्ष्मण पवार, राजु बांगारे, कमलाकर तांडेल, धर्माजी तांडेल,बकुला म्हात्रे, गुरव मॅडम, प्रतिभा म्हात्रे, आशा राणे, अपर्णा गदमले,अनिल माने,अमोल आवटे,ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरेश शेडगे वाघोशी हायस्कूल यांनी केले. साउंड सिस्टीम साठी चंद्रकांत सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे नियोजन व तयारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, सदस्य रोशनी चव्हाण, शेखर शिर्के, निलेश जाधव, समीर दळवी, शोभा सुतार, अर्पिता सुतार, पूनम वाघमारे, सविता शिर्के, संचिता तोंडे, दिव्या सुतार, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सुनील जाधव, माजी विद्यार्थी सचिन खोले, अथर्व सुतार, शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद म्हात्रे, संगीता बैकर, वृषाली गुरव, शीतल पाटील, अनुजा माने, रुपाली लेंडवे, अंकिता जाधव, रवींद्र सुखदरे, माधुरी जाधव, सर्व माजी विद्यार्थी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सखी सावित्री समिती, शाळा सुरक्षा समिती,सर्व ग्रामस्थ व पालकांनी मोलाचे सहकार्य केले.