। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याणातील स्कायवॉकवर दोन अज्ञात चोरट्यांनी भाजी विक्रेत्यावर दगड फेकून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचे पैसे, मोबाईल लुटून पोबारा केल्याचा धक्कादायक बातमी समारे येत आहे.
कल्याण पूर्व-पश्चिम जोडणार्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाचा हल्ला करीत भाजी विक्रेता सुरेश सिंग यांस गंभीर जखमी करून त्याच्या खिशातून 6 हजार रुपये आणि मोबाईल चोरी करून पोबारा केला आहे. या हल्ल्यात सुरेश सिंह गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात चोरट्या आरोपीचा शोध सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.