रायगड निवृत्त पोलिसांचा वार्षिक मेळावा

20 जणांनी केले रक्तदान
। अलिबाग । वार्ताहर ।
निवृत्त पोलिसांना वेळेवर पेन्शन मिळाली पाहिजे, महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, संघटना असल्याने आपली राहिलेली कामे झटपट होतात यासाठी निवृत्त झालेल्यांनी संघटित राहिले पाहिजे.वार्षिक मेळाव्यास असलेली उपस्थिती वरून रायगड संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासार यांचे कार्य उत्तम आहे असे मार्गदर्शन मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक गोपाळराव महांगडे निवृत्त एसीपी व महाराष्ट्र अध्यक्ष यांनी सांगितले. यावेळी सोपानराव महांगडे, काशिनाथ कचरे, निवृत्त एसीपी, कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, माधव माळवे निवृत्त एस.पी.ठाणे, रघुनाथ घरटे निवृत्त एसीपी सचिव ठाणे, सोपानराव जाधव निवृत्त एसीपी, रायगड भूषण जयपाल पाटील, राजेंद्र कासार रायगड अध्यक्ष, सुरेश म्हात्रे उपाध्यक्ष हे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन त्याचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस रुग्णालयात जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यामध्ये 20 जणांनी रक्तदान केले. या मेळाव्यास 145 सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष सुनील गोंधळी यानी तर आभार नारायण चांदोरकर यांनी केले.

Exit mobile version