तंत्रनिकेतनमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण

| खोपोली | प्रतिनिधी |

बी.एल.पाटील तंत्रनिकेतनमध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक-बौध्दिक विकास करण्यासाठी वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक आणि निरोप समारंभ सोहळा शनिवारी काँलेज सभागृहात आनंदात संपन्न झाला. यावेळी गँरी खन्ना, कौशिक पटेल, संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, राजू ठक्कर, दिलीप पोरवाल, अबू जळगांवकर, चंद्रकांत केदारी, भास्कर लांडगे आदि उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदानी खेळ, रांगोळी, चित्रकला आणि निबंध, वकृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अविनाश मोरे यांनी तर अभार प्रा. शिवाजी मुरादे सरांनी मानले.

Exit mobile version