अग्रवाल विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन

| नागोठणे | वार्ताहर |

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील कै. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर, कै स. प्र.जैन कनिष्ठ महाविद्यालय व कै अ.जे.जैन प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संकुलाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या हस्ते मंगळवारी (दि.19) उत्साहात संपन्न झाला.

तीन दिवस चालणार्‍या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या हस्ते, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नागोठण्यातील मायालक्ष्मी हॉस्पीटलचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्या हस्ते तर चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त कला शिक्षक भास्कर सोलेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यासंकुलात स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, नागोठण्याचे सपोनि संदीप पोमण, नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर, डॉ. सुनील पाटील, प्राथमिक शाळा समिती सदस्य जयराम पवार, भास्कर सोलेगावकर, राधिका ठाकूर, आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव, निवृत्त विस्तार अधिकारी एस.एन. गायकवाड, सिराज पानसरे, तानाजी लाड, मंगेश तेरडे, निलोफर पानसरे, प्रतिभा तेरडे, वर्षा देशपांडे, सुप्रिया परदेशी, प्रमोद कदम, राजश्री शेवाळे, के.बी. गाडे, पी.सी. शिंदे, संतोष गोळे आदिंसह सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राधिका ठाकूर यांनी तर सुत्रसंचालन मेघना म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version