पोलीस पाटलांची वर्षासहल

। कोलाड । वार्ताहर ।

कोलाड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या संकल्पनेतून पोलीस पाटील यांच्याबरोबरचे नाते वृद्धिंगत व्हावे याकरिता कोलाड पोलीस ठाणे यांचे मार्फतीने पोलीस पाटील यांची वर्षा सहल गोपनीय पोलीस अंमलदार नरेश पाटील यांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील मिर्‍यामहल डोंगरातील वाघेश्‍वर मंदिर येथे आयोजित केली होती.

सदर सहलीसाठी कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील 18 पोलीस पाटील तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस अंमलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील तसेच वाघेश्‍वर मंदिराचे वडखळ येथील रणजीत पाटील भूषण पाटील, पिंपळपाडा येथील दत्ता पाटील, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अमोल म्हात्रे, उमेश साळुंखे, मंदिराचे भोपी अनाजी नाटमे आदी उपस्थित होते.

वर्षासहलीच्या प्रारंभी पोलीस पाटील पदावरून निवृत्त झालेले चिंचवली तर्फे दिवाळीचे पोलीस पाटील रवींद्र कृष्ण येरुणकर, गोवा पोलीस पाटील ऐन वहाळ पोलीस पाटील प्रकाश मोरे यांचा तसेच रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोष दळवी, रोहा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गणेश महाडिक, रायगड जिल्हा सल्लागार पुई पोलीस पाटील मंजिरी कदम तसेच आपल्या रिक्षामध्ये प्रवाशाचे मोबाईल तसेच पैशाचे पाकीट हे प्रामाणिकरित्या परत करणारे पोलीस पाटील संदीप रामजी बाईत यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार समारंभ नंतर सर्व पोलीस पाटील व मान्यवरांनी वाघरेश्‍वर येथील धबधब्यामध्ये वर्षा सहलीचा आनंद लुटला. झालेल्या छोटेखानी भोजनाचा आस्वाद घेऊन सदर वर्षा सहलीची सांगता करण्यात आली.

Exit mobile version