। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज या परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. यावेळी भुमकर पुलावर चार ते पाच गाड्या एकमेकांना भिडल्या आहेत. यात 3 गाड्याचं नुकासान झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. या परिसरात अपघात झाल्याची आठवड्यातली दुसरी घटना आहे. यात तीन गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच एक ते दोन जणांना किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात अद्याप कोणीतीही जिवितहानी झाली नाही. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.







