रिक्षाचालक गोळीबारप्रकरणी आणखी एकास अटक

| नेरळ | वार्ताहर |
रायगड जिल्हा हद्दीत बदलापूर येथील रिक्षाचालकावर नेरळजवळील दामत-पेशवाई रोड रस्त्यावर 22 मे रोजी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणार्‍या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी आतापर्यंत दोघांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या गोळीबार करण्याची सुपारी देणारा बदलापूर येथील सराईत गुन्हेगाराचा शोध रायगड पोलीस घेत असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींचा शोध महत्त्वाचा असल्याने पोलीस त्या दोघांच्या शोधात आहेत.

सदानंद मुंढे या रिक्षाचालकावर गोळीबार करण्याची सुपारी ठाणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पप्पू बागुल याने दिली असल्याची माहिती बेकरे गावातील 30 वर्षीय तरुण याने दिली आहे. तर, राका आणि कुमार यांनी काही आर्थिक रकम घेऊन सदानंद मुंढे यांच्यावर गोळीबार केला. त्यासाठी रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल हे बागुल याने दिले असल्याची कुमार याने दिली असून, त्याला त्या दोन्ही वस्तू राकाकडून मिळाल्या होत्या आणि गोळीबार करून झाल्यावर रिव्हॉल्वर आणि मोबाईल घेऊन राका हा दुचाकी घेऊन आलेला गुन्हेगार तरुण कुमार कराळे यास बेकरे फाटा येथे सोडून निघून गेला होता. नेरळ पोलिसांनी कुमार कराळे यास सदानंद मुंढे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी 31 मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, या गुन्ह्यातील दोन प्रमुख आरोपी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली आणि त्यानुसार तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली.

रिक्षाचालक सदानंद मुंढे यांच्यावर गोळीबार करण्याची सुपारी देणारा पप्पू बागुल याच्यावर रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, कर्जत आणि नेरळ या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रिक्षाचालक मुंढे यांनी गुन्ह्याची फिर्याद देताना आपल्या गावातील ज्या प्रकाश सुरोशे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली होती, या तक्ररीनंतर सुरोशे यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे सुरोशे यांचं सहभाग या गुन्हयात कितपत आहे यांची माहिती देखील पोलिसांना मुंढे यांना मारण्याची सुपारी ज्याच्याकडून घेतली याची माहितीसाठी पप्पू बहुल पोलिसांच्या हाती लागणे महत्वाचे असल्याचे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version