| म्हसळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांच्या जयंती निमित्त म्हसळा येथील वसंतराव नाईक तसेच बॅ.ए.आर. अंतुले महाविद्यालयात सकस खाद्य महोत्सव कार्यक्रम व अन्नधान्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 100 गरजुंना याचा लाभ मिळाला. कोकण उन्नती मित्र मंडळाचे सचिव अशोक तळवटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संस्था खजिनदार वंदना विचारे, महाविद्यालयीन विकास समिती विश्वस्त सचिव प्रतिनिधी फझल हळदे, डॉ. मुश्ताक मुकादम, विकास समिती सदस्या निलम वेटकोळी, समाज सेवक निजाम कागदी, नफिस शहापुरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी केले. सूत्र संचालन प्राध्या. बेंद्रे, प्रा. भोसले यांनी केले.






